भोसरी (Pclive7.com):- भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी व परिसरातील ७० डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम इंद्रायणीनगर, भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता.
कोरोना सारख्या काळात समाजाच्या हितासाठी या सर्व डॉक्टरांनी अनमोल कार्य केले आहे. ही मोठी देशसेवा व कौतुकास्पद कामगिरी असल्याचे आमदार महेशदादा लांडगे ह्यांनी सांगितले.
आमदार महेशदादा लांडगे यांनी ह्या वर्षी वाढदिवस साजरा न करता आपला हा दिवस कोरोना योध्दांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. दादांच्या विचारांनी प्रेरित होउन क्षेत्रातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या या लढवय्यांचे योगदान समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी काळात चांगले कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत असल्याचे मत आयोजक भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष शिवराज सुदामराव लांडगे यांनी व्यक्त केले.
युवा मोर्चा कोरोना च्या काळात लोकांपर्यंत पोहाचवण्यामधे नेहमी अग्रेसर राहिलेले आहे. लोकांना उपचार असतील बेडची उपलब्धता मिळवून देण्यासाठी आम्हाला डॉक्टरांचे सहकार्य लाभले. अनेक रुग्ण सुखरूप आपल्या लोकांमधे आज आहेत ते डॉक्टरांनी केलेल्या सेवेमुळेच असे भोसरी चर्होली मांडलाचे अध्यक्ष उदय दत्तात्रय गायकवाड ह्यांनी नमूद केले. चिटणीस प्रकाश ह्यांनी डॉक्टरांनी केलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानले.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेंद्र लांडगे, विलास मडीगेरी, महिला अध्यक्षा उज्वळताई गावडे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, दत्ता गव्हाणे तेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.