डाॅ.श्रीमंत कोकाटे यांच्या निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी राहूल पोकळे यांचे प्रतिपादन
पिंपरी (Pclive7.com):- अत्यंत सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेले श्रीमंत कोकाटे हे ६२ उमेदवारांमध्ये एकमेव पी.एचडी. असणारे उच्चशिक्षित उमेदवार आहेत. महापुरूषांचे विचार खर्या अर्थाने तळा-गाळापर्यंत पोचविण्याचे काम कोकाटे हे करीत आहेत.समाजातील उपेक्षित घटकाच्या समस्या तसेच पदवीधरांच्या विवीध प्रश्नांसाठी ते अग्रेसर राहिले आहेत. यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. जनशक्तीपूढे विरोधकांच्या धनशक्तीचा निभाव लागणार नाही. सुजाण मतदार डाॅ.श्रीमंत कोकाटे यांना नक्कीच विजयी करतील, असा विश्वास राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. इतिहास संशोधक डाॅ. श्रीमंत कोकाटे हे ही या पदवीधर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव या ठिकाणी त्यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नागरी हक्क सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष मानव कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनीही डाॅ.श्रीमंत कोकाटे यांना मतदान करण्याचे आवाहन करत त्यांच्या कार्याचा आढावा मांडला. कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केले होते.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, विजय धेंडे, दीपक खैरनार, माऊली सोनवणे, मोहन अडसुळ, धम्मराज साळवे, विशाल जाधव, नकुल भोईर, गिरीष वाघमारे, चंद्रकांत लांबखडे, राहूल ओझरकर, शेकापचे नितीन बनसोडे, शरद मालपोटे, नाना फुगे, अपना वतनचे हमिद शेख, पंकज घाडगे, सुभाष जाधव, महेश कांबळे, योगेश साळवी, संदिप कोकाटे आदी उपस्थित होते.
यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ,नागरी हक्क सुरक्षा समिती,अपना वतन संघटना,सम्राट सेना,पंचशिल मंडळ-थेरगाव,बहूजन हिताय-बहूजन सुखालय ग्रंथालय,भारतीय रिपब्लिकन फेडरेशन यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांनी श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीला पाठींबा दिला आहे.