पिंपरी (Pclive7.com):- वाहन चालवताना जसे सीट बेल्ट किंवा हेल्मेट सुरक्षा कवच ठरते. तसेच कोरोना लस वरदानच ठरत आहे. मात्र सध्या कोरोना लस संदर्भात समाजात काही अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. मात्र कोविशिल्ड हि भारतीय बनावटीची लस पूर्णपणे सुरक्षित असून स्वतःच्या व कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी लस टोचून घ्यावी. असे आवाहन पॅथॉलॉजिस्ट डॉ.विजय सातव यांनी केले.
चिंचवड स्टेशन येथील क्वीन्स टाऊन हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने डॉ. विजय हिरामण सातव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
डॉ.सातव पुढे म्हणाले कि, या सोसायटीमध्ये सर्व सभासदांनी काटेकोरपणे सर्व महामारीचे नियम पाळल्यामुळे कमीत कमी लोकांना कोरोना होऊनसुद्धा ऍडमिट करावे लागले नाही. भावी काळात कोविशिल्ड लस सर्वांनी घेण्याचे आवाहन करीत आपण सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्क वापरणे अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे आपण गाडी चालवताना सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर करतो. अशाप्रकारे आपल्याला जीवनप्रवास करताना कोविशिल्ड हि लस उपयुक्त ठरणार आहे.
ही लस घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रमाणात कोरोनामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतील. बाळकृष्ण खंडागळे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये पाचशेहून अधिक लोकांना अन्नदानाचा उपक्रम चार ते पाच महिने चालू ठेवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन सुजित पाटील होते. सचिव शिरीष पोरेडी, खजिनदार युजीन वराडकर आणि सर्व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार नेते सुरेश गारगोटे यांनी केले. श्री. शिरीष पोऱेडी यांचा सहकार्यामुळे आणि डॉ.योगेश अग्रवाल, डॉ.अविक्षित काळे व सोसायटीतील इतर डॉक्टरांच्या सहकार्याने पहिले सुसज्ज असे कोविड सेंटर सोसायटी मध्ये सुरु करण्यात आले होते.