पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील वै.ह.भ.प. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय पी.के. स्पोर्ट्स वर्ल्ड अकॅडेमीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, कॅप्टन प्रमोद नलवडे, कुणाल तावर, कॅप्टन गायकवाड, विजय टेपुगडे, प्रशांत घाडगे, पी.के. स्कुलचे संचालक सोमनाथ काटे, रोहन काटे, शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी शासकीय सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी स्वराज्य आर्चरी अकॅडमीच्या मुलांनी आर्चरी प्रात्यक्षिके दाखवली. त्यामध्ये अमर सुतार, अभिजाय, शर्वरी, सोमनाथ, पारस, प्रितिका, परिमल, आर्या, करिष्मा आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कुणाल तावरे यांनी केले. तसेच मार्गदर्शन व आयोजन क्रीडा शिक्षक राहुल कोरे यांनी केले.
या स्पोर्ट्स अकॅडेमीमध्ये लॉन टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, आर्चरी, बॅडमिंटन, शूटिंग, लाठी काठी, योगा, कराटे, बॉल- बॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकला गायकवाड व सयनाजी शिंदे यांनी केले.