पुणे (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सागर म्हस्के यांची फेरनिवड करण्यात आली. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी याबाबत निवडीचे पत्र दिले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून सागर म्हस्के यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप, जगदीश मुळीक, महेशदादा लांडगे यांनी माझ्या कामावर विश्वास दाखविला. त्यामुळेच पुन्हा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी माझी फेरनिवड झाली असल्याचे भावना सागर म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून पक्ष वाढीचे काम अधिक जोमाने करणार असल्याचे म्हस्के म्हणाले.