पिंपरी (Pclive7.com):- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन काळेवाडी पोलिस चौकी परिसरात लहान मुलांना समोसा, जिलेबी व पेढे वाटप करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एपीआय दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी एपीआय दाभाडे, पीएसआय क्षिनगारे, पीएसआय मनेर, काळेवाडी पोलिस चौकीचे कर्मचारी आर.एम.तळपे, इ.आय.मोमीन, जी.एम.आडके, पोलिस शिपाई ज्ञानेश्वर तोडकर, पोलिस नाईक अमोल दातार, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक भारतीय लहुजी पँथर तसेच राष्ट्रीय सदस्य एक मराठा लाख मराठा युवराज दाखले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सचिन लिमकर, आनंद कुलकर्णी, राहुल शिर्के, सुमित शिंदे आदी उपस्थित होते.
तसेच भारतीय लहुजी पँथर मध्यवर्ती कार्यालय भोसरी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरातील बालाजीनगर मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय लहुजी पॅंथर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांचे वतीने संदिपान झोंबाडे यांच्या हस्ते व एमआयडीसी पोलीस स्टेशन पीएसआय ढेरे आणि पीएसआय पंचमुख यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भारतीय लहुजी पॅंथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन निमकर, बालाजीनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बीबी शिंदे, सुभाष बनसोडे, किसन सरवदे, कोंडाबाई गायकवाड, अंगणवाडी सेविका शैलेजा चौधरी, श्रमिक महीला विकास संघाच्या अध्यक्ष सविता झोंबाडे, सविता आव्हाड, सुरेश मिसाळ, आकाश शिंदे, सागर बोरसे, महादेव सोनवणे, रविंद्र कांबळे, नामदेव घोलप, भारतीय लहुजी पँथर ग प्रभाग अध्यक्ष दिलीप गोरके, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने भारतीय लहुजी पँथर आनंदनगर चिंचवड या ठिकाणी ध्वजारोहन करून नामफलकाचे अनावरण नगरसेवक काळुराम पवार व संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटक युवराज दाखले, शहर अध्यक्ष शंकर झोंबाडे, आनंदनगर चिंचवडचे अध्यक्ष दशरथ कांबळे, ग प्रभाग अध्यक्ष दिलीप गोरके, जनसेवक मुन्नाभाई कुरेशी, मल्हारी कांबळे, नेताजी शिंदे, रमेश शिंदे, मल्हारी साठे, हनुमंत वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवशाही बांधकाम मजुर आघाडीच्या वतीने छञपत्ती संभाजी महाराज चौक रहटणी फाटा लेबर नाका या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरचिटणीस सचिन आण्णा लिमकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून जिलेबी वाटप करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा या देशव्यापी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य युवराज दाखले, तुकाराम शिंदे, दादा देडे, आमोल तेलंगे, अरूण तांबे, दिलीप गोरके, राहुल शिंदे, आनिल सोनवने, रोहीत कदम, भाऊसाहेब आनंद भगत, उत्तम गंगावने, भिम वाळके, विनय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.