पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणूकीत भाजपाचे राहुल जाधव विजयी झाले आहे. राहुल जाधव यांना ८० मते मिळाली. राष्ट्रवादीला ३३ मतांवर समाधान मानावे लागले. जाधव ४७ मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे विनोद नढे पराभूत झालेत. दरम्यान या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. तर मनसे आणि अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले.
महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव यांनी तर राष्ट्रवादीकडून विनोद नढे यांना उमेदवारी दाखल केले होते.
महापौर पदासाठी झालेले मतदान
भाजप – ८०
राष्ट्रवादी – ३३
निकाल – भाजपाचे राहुल जाधव ४७ मतांनी विजयी.
या निवडणुकीसाठी पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हि विशेष सभा पार पडली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादीने भाजपाची विनंती धुडकावून लावत ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.