पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरी करण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका कल्पलता डीकृझ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तीमत्व आहे कि, भारताला स्वातंत्र्य कशामुळे व कोणामुळे मिळाले? या प्रश्नाचा उत्तराचा शोध घेतल्यास पहिले नाव येईल ते नेताजींचेच येते. सुभाषचंद्र बोस यांनी एक हजार सभा देशभरात घेतल्या. आपल्या सैन्याला आपल्यावर पूर्ण विश्वास असावा यासाठी ते पूर्ण प्रयत्न करीत असत. “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” हे त्यांचे ब्रीदवाक्य कायम लक्षात राहण्यासारखे आहे.” असे मुख्याध्यापिका कल्पलता डीकृझ यांनी उद्गारले.
त्याच बरोबर शाळेतील शिक्षकांनी व इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी पूजा चौधरी हिने आपले मनोगत व्यक्त केले. सचिन कळसाईत यांनी सूत्रसंचालन केले आणि रिटा राजभोर यांनी आभार मानले.