पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार कसा चालतोय हे पाहण्यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार थेट प्रेक्षक गॅलरीत आज (दि.२०) दाखल झालेत. कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑफलाईन पद्धतीने सुरू झालीयं.
महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे आजची सभा धरून केवळ तीन सर्वसाधारण सभा होतील.
त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या ऑफलाइन सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे सुद्धा उपस्थित होते.