पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे हायवे पुलाजवळ होत असलेली नेहमीचीच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेखर ओव्हाळ यांनी म्हटले आहे, पिंपरी चिंचवड येथील पुनावळे हायवे पुलाजवळ सतत ट्राफिक होत असते. सरकारने अनलॉक केल्यानंतर शाळा, कॉलेज सुरू झाले आहे. ट्राफिक पोलीस नसल्याने येथे वाहतुक कोंडी होत असते.
त्यामुळे स्थानिक लोकांना व शाळा, कॉलेज चालु झाल्यामुळे सर्व विद्यार्थी वर्गाला हा त्रास होत आहे. आम्ही सहकारी मित्रपरिवार वाहतुक कोंडी हटवून येथील नागरिकांना सहकार्य करित असतो. व कोणाला त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतो.
मात्र येथे लवकरात लवकर ट्राफिक पोलीस देऊन येथील वाहतूक कोंडीला मोकळा श्वास द्यावा अशी मागणी शेखर ओव्हाळ यांनी केली आहे.