पिंपरी (Pclive7.com):- दोन वर्षानंतर राज्यात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र याला गालबोट लागल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. एका सराईत गुन्हेगारांने रंग लावण्याचा बहाण्याने माय लेकीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वैभव माने याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने चिंचवडच्या रामनगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत पसरविली होती. या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई हे घराच्या समोरील ओट्यावर रंग खेळत होत्या. बेसावध असलेल्या दोघींना पाहून आरोपीने अगोदर आईला मिठी मारून रंग लावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अल्पवयीन मुलगी घाबरून घरात पळून गेली. परंतु, आरोपी घरात शिरला आणि तिचाही विनयभंग केला असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडित तक्रारदार महिलेच्या पतीने आरोपी वैभवला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणानंतर रामनगर परिसरात आरोपीने हातात कोयता घेऊन दहशत पसरविली होती. या प्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

























Join Our Whatsapp Group