पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या बाहेर नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या दोन गटात चांगलाच राडा झाला.

आज दुपारी अडीचच्या सुमारास विद्यार्थिनींच्या दोन गटातील वाद रस्त्यावर आले. शेवटी एका ज्येष्ठ नागरिकास हे भांडण सोडविण्यासाठी पुढे यावे लागले. या आठवड्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून यातून काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.
यापूर्वी देखील अनेकवेळा याठिकाणी असे प्रकार घडत असल्याने पोलिसांनी शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळेस गस्त घालावी अशी मागणी पालक, व स्थानिक रहिवाशी करत आहेत.