पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी यापूर्वी २७ फेबुवारी मतदान होणार होते. मात्र, आता निवडणुक आयोगाने ही तारीख बदलली आहे. आता कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात या काळात १२ वीची परीक्षा तसेच अनेक महाविद्यालयात पदवी परीक्षा होत आहे. त्यामुळे परीक्षाच्या काळात मतदानासाठी या शाळा व महाविद्यालये मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचे पुणे जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला कळविले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मतदानाच्या तारीखेत बदल करण्यात आला असून आता सोमवार ऐवजी रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे..
# अर्ज दाखल सुरू – ३१ जानेवारी २०२३
# अर्ज दाखल अंतिम दिनांक – ०७ फेब्रुवारी २०२३
# अर्ज पडताळणी – ०८ फेब्रुवारी २०२३
# अर्ज माघार – १० फेब्रुवारी २०२३
# मतदान – २६ फेब्रुवारी २०२३
# मतमोजणी – ०२ मार्च २०२३