पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, चिंचवड या प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ चिंचवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी चिंचवड गावातून काढण्यात आली. चिंचवड चापेकर चौक ते शिवाजी उदय मंडळा पर्यंत काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत भारत माते सह विविध संत व स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या प्रसंगी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका पूनम वाघ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, व गीते सादर केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी निंबाळकर, ज्येष्ठ समाजसेवक गजानन भालेकर शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष सदाशिव गोडसे, विश्वस्त दादा गावडे, प्रशालेच्या माजी प्राचार्या प्रज्ञा जोशी, विजया विभांडीक, प्राचार्य अनिल झेंडे, पर्यवेक्षिका माधवी कुलकर्णी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका योगिता बनकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा मुळूक यांनी केले. तर आभार जया कट्टे यांनी मानले.