चिंचवड (Pclive7.com):- बद्रीकाश्रम ज्योतिष्पीठाधीश शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या संकल्पानुसार व मार्गदर्शनाने अष्टविनायक सहस्रार्चन यात्रा ७ जुलै ते १२ जुलै २०२४ या कालावधीत श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र थेऊर येथून संपन्न होणार आहे.
याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली. महोत्सवाचे उद्घाटन ७ जुलै रोजी असून संध्याकाळी ५ वाजता स्वामींचे आगमन होईल. यावेळी चारही वेदांचा मंत्रजागर व पाद्यपूजन सोहळा होईल. हा कार्यक्रम मा. डॉ. श्री. राजेशजी परदेशी सर, धर्मदाय उप आयुक्त, पुणे; मा. न्यायमूर्ती श्री. मदनजी गोसावी सर, माजी न्यायाधीश, केंद्रीय अन्वेषण विभाग; मा. डॉ. श्री. दिलीपजी पाटील भुजबळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र पोलीस मा.श्री.जयंतजी म्हैसकर सर, चेअरमन,MEP Infra.Dev.Ltd.; मा. सौ. भाग्यश्रीताई प्रसादराव पाटील, अध्यक्ष, संचालिका राईज अँड शाईन बायोटेक लि.; तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री.जितेंद्र देव, श्री.केशव विद्वांस, अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. देवराज डहाळे आदी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत यात्रा संपन्न होणार आहे.
दि.८ जुलै ते ११ जुलै दरम्यान दररोज सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री गणेश पंचायतन याग, सकाळी ७ वाजता सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण, सकाळी ७.१५ ते ८.०० वाजेपर्यंत श्री शंकराचार्यांचे पाद्यपूजन, आणि सकाळी ०८.०० ते ९.०० वाजेपर्यंत स्वामींजींचे प्रवचन व आशीर्वचन असेल.
अष्टविनायक यात्रेच्या विविध ठिकाणांवरचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत: दि. ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता स्वामीजी श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव येथे व दुपारी ३.३० वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक येथे भेट देतील. दि. ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता स्वामीजी श्री बल्लाळेश्वर मंदिर, पाली येथे व सायंकाळी ५ वाजता श्री वरदविनायक मंदिर महड येथे भेट देतील. दि. १० जुलै रोजी दुपारी २ वाजता स्वामीजी श्री गीरीजात्मज मंदिर, लेण्याद्री व दुपारी ३.३० वाजता श्री विघ्नेश्वर मंदिर ओझर येथे भेट देतील. दि. ११ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता स्वामीजी श्री महागणपती मंदिर, रांजणगाव, येथे व दुपारी ३ वाजता पुन्हा श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव येथे भेट देऊन या अष्टविनायक सहस्रार्चन यात्रा संपन्न होईल. दि. १२ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता श्री गणेश पंचायतन यागाचा पूर्णाहुती सोहळा होऊन त्यानंतर ही यात्रा संपन्न होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना सर्व गणेशभक्त भाविकांनी उपस्थित राहून पुण्यसंचय करावा असे आवाहन चिंचवड देवस्थानच्या विश्वस्त मंडळांने केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र थेऊर आहे.
Tags: अष्टविनायक यात्राअष्टविनायक सहस्रार्चन यात्राथेऊरबद्रीकाश्रम ज्योतिष्पीठाधीश शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजमोरया गोसावी देवस्थान