पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे आज ठाकरेंची मशाल हातात घेतली आहे. मोठं शक्तिप्रदर्शन करत लांडगे मुंबईत दाखल झाले होते. आज त्यांनी मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, एकनाथ पवार तसेच शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेतही रवी लांडगेनी घड्याळाचा प्रचार दणक्यात केला. मात्र भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगे यांना महायुतीतून तिकीट मिळणार नाही हे उघड होते. म्हणूनचं रवी लांडगे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदरसंघात दावा केला आहे. मविआमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला ही मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत रवी लांडगे यांनी आज प्रवेश केला आहे.
कोण आहेत रवी लांडगे..
# भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे
# भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद त्यांच्याकडे होते
# २०१७ महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक
# भोसरीतील आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक