पुणे (Pclive7.com):- वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
बापूसाहेब पठारे हे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे वडगाव शेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बापूसाहेब पठारे यांच्यासोबत माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांनी देखील प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेश समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, वडगांव शेरी विधानसभा कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू उपस्थित होते.