पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील कराची चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षामध्ये या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.
चिंचवड येथील चापेकर चौकात देखील महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. या चौकात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित आदी उपस्थित होते.