पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत मूर्ती विसर्जन केंद्रावर ४१९२ गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. सलग ६ वर्ष सुरु असलेल्या या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यंदाच्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली होती. याच बरोबर गणेश विसर्जन व संकलन सुरळीतपणे पार पडणेकामी ३० स्वयंसेवक, २ जीवरक्षक तसेच निर्माल्य जमा करणेकामी निर्माल्य कलश यांची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या वतीने निर्माल्य कलश व सफाई कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान सकाळी ८ ते रात्री १२ या कालावधीमध्ये नागरिकांनी मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा लाभ घेतला. विसर्जन केंद्रावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा पिंपरी यांचे देखील सहकार्य लाभले. संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे अशी माहिती संदीप वाघेरे यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन सचिन वाघेरे, रंजनाताई जाधव, शेखर अहिरराव, गणेश मंजाळ, पवन हिरवे, सारथी काळे यांनी केले.