जुनी सांगवीत आमदार अश्विनी जगताप यांचा बैठक, कोपरा सभांचा धडाका
चिंचवड (Pclive7.com):- जुनी सांगवी परिसराचा कायापालट स्वर्गीय लक्ष्मण भाऊ यांच्यामुळे झाला. त्यामुळे त्यांचाच वारसा पुढे चालवणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्याच पाठीशी आम्ही उभे राहणार असून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार जुनी सांगवी परिसरातील मतदारांनी केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, शितोळे नगर, पवार नगर, लक्ष्मी नगर, ममता नगर, पवनानगर, प्रियदर्शनी नगर, शिवांजली रोड भागात बैठका, कोपरा सभा तसेच महिला बचत गटांशी संवाद साधला.
यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, उज्वला सुनील ढोरे, मंदाकिनी तनपुरे, सारिका भंडलकर, संगीता दीक्षित, दर्शना कुंभारकर, सोनाली शिंपी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारांशी संवाद साधताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पुढाकारातून आपण चिंचवडचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल टाकले होते. शंकर जगताप हेदेखील लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याप्रमाणेच विकासाचे स्मार्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या चिंचवड विधानसभेच्या स्मार्ट विकासासाठी स्मार्ट व्हिजन असणाऱ्या शंकर जगताप यांना साथ देऊन विधानसभेत पाठवा. ‘परिसराच्या विकासासाठी शंकर जगताप यांना भरघोस मतदान करा’ असे आवाहन अश्विनी जगताप यांनी केले.
जगताप कुटुंब आणि सांगवीकरांचे जुने ऋणानुबंध आहेत. जे आम्ही कायम जोपासले आहेत. यापूर्वीही सांगवीतील ग्रामस्थांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्व. लक्ष्मणभाऊ असतील किंवा मी असेल आमच्या दोघांवरही विश्वास व्यक्त करत भरभरून मतदान केले आहे. यावेळी हाच विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यावरही ठेवून त्यांना आपल्या सांगवी परिसर आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्मार्ट विकासासाठी विधानसभेत पाठवावे असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.