भारतीय राज्य घटनेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात घोषणा; सुशिक्षित- उच्चशिक्षीत पिंपरी-चिंचवडकरांची महायुतीला साथ
भोसरी (Pclive7.com):- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी- चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न केवळ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच मार्गी लागला आहे. मोशीत भव्य न्याय संकुल उभारले जात आहे. याशिवाय देशातील पहिले संविधान भवनही चिखलीत साकारत आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा भाजप उमेदवार महेश लांडगे यांना असल्याचे भोसरी विधानसभेतील विधीक्षेत्रातील उपस्थित तज्ञांनी जाहीर केले आहे. कायद्याचे अभ्यासकही सोबत आल्याने आमदार लांडगे यांचे बळ वाढले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त विधी व न्याय फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीमध्ये वकीलांसाठी व्याख्यानमाला व स्नेह मेळावा आयोजित केला होता. यास ४०० वकिलांनी सहभाग नोंदविला होता.
याप्रसंगी ॲड. गणेश शिरसाट यांनी “केशवानंद भारती” द अनटोल्ड स्टोरी या ऐतिहासिक खटल्यावर व्याख्यान देऊन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. ॲड. मंगेश खराबे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची व भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाची महिती दिली. तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड मध्ये तयार होणाऱ्या न्यायसंकुल इमारतीची व मोशी मध्ये सकारण्यात येणाऱ्या संविधान भवनाची ध्वनि चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी विधी अभ्यासक्रमाचे विविध महाविद्यालातील विद्यार्थी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय २०१८ पासून अस्तित्वात आले आहे. त्याला ग्रामीण भागातील पोलिस ठाणेही जोडली आहेत. शहरातील ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती केली आहे. शिवाय, खटल्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे न्यायालयाची पूर्वीची मोरवाडीतील इमारत कमी पडत होती. तेथील कामकाज आता नेहरूनगर येथील इमारतीत सुरू आहे. मात्र, शहरातील न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत असावी, जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ न्यायालय असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी राज्याच्या विधी खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. न्यायालय संकुलासाठी स्वतंत्र जागा मिळवून दिली. मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १४ मध्ये १६ एकर जागेत संकुलाचे कामही सुरू झाले.
… म्हणून आमचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा
आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातूनच भव्य न्यायसंकुल इमारत उभारत आहे. मोशी येथील भारतातील एकमेव संविधान भवनाची निर्मितीसाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला. वकिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. आजपर्यंत शहरातील एकाही नेत्याने आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. आमदार लांडगे यांनी आमचे प्रश्न समजावून घेऊन मार्गी लावले. वकिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ॲड. विशाल विश्वास डोंगरे यांनी उपस्थित सर्व वकीलांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना एकमताने पाठिंबा असल्याचे जाहीर केला.
पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ॲड. धनंजय कोंकणे, ॲड . एस. बी. चांडक, ॲड. गोरखनाथ झोळ, ॲड. दिनकर बारणे, ॲड. संजय दातीर- पाटील, ॲड. गोरक्ष लोखंडे, ॲड. अशोकपाल शर्मा, ॲड. धनंजय वठारकर, ॲड. मंगेश लोहारे, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश डोंगरे, ॲड. योगेश सोनवणे, ॲड. नितीन मोरे, ॲड. रोहित चिंचवडे, ॲड. हेमंत रमाने, ॲड. दत्ता झुळूक, ॲड. संगीता परब, ॲड. रीना मंगदुम, ॲड. रूपाली वाघेरे, ॲड. चित्रा फुगे, ॲड. नवनाथ जगताप, ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सुषमा वसाणे, ॲड. पुनम स्वामी, ॲड. मोनिका सचवाणी, ॲड. सुषमा नामदास, ॲड. अजय यादव उपस्थित होते.
पिंपरी- न्यायालय संकुलासाठी मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १४ मध्ये १६ एकर जागा मंजूर करून आणली. न्याय संकुलाचे कामही सुरू झाले आहे. या जागेवर न्यायालयाची नऊ मजली इमारत व न्यायाधीश राहण्याची व्यवस्था असेल. सर्व कोर्ट सुरू होतील. त्यामुळे शहरातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुण्यात जावे लागणार नाही. संविधान भवनाच्या कामाचीही पायाभरणी झाली आहे. वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी उपलब्ध असेल.– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार, महायुती.