पिंपरी (Pclive7.com):- संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत आकुर्डीतील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुलींनी तृतीय क्रमांक मिळवला.

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेचे गुरुवार दि.९ रोजी विश्वेश्वर मंदिर चिंचवड या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
आंतरशालेय समूहगीत स्पर्धेमध्ये गट क्र.२ (इ.३ री व इ.४ थी) मध्ये श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, आकुर्डी या शाळेतील मुलांनी प्रथम क्रमांक तसेच मुलींनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे. सदर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक, सचिव मा. दाभाडे सर, संगीत शिक्षक श्री. कोळप प्रकाश सर यांनी मार्गदर्शन केले.

























Join Our Whatsapp Group