पिंपरी (Pclive7.com):- टाटा मोटर्स क्रीडांगणावर औद्योगिक क्रीडा संघटनेची ६१ वी कबड्डी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेमध्ये बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, बजाज ऑटो वाळुज, जेसीबी, टाटा मोटर्स ए, टाटा मोटर्स बी, अमुनेशन फॅक्टरी महिंद्रा अँड महिंद्रा ए,महिंद्रा अँड महिंद्रा बी ,एसकेएफ या १० संघांनी भाग घेतला आहे.ही स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महेंद्र अँड महेंद्रचे एचआरचे वरिष्ठ व्यवस्थापक दत्ता गायकवाड म्हणाले की, या स्पर्धेमध्ये अत्यंत तरुण खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या स्पर्धेचा प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होईल असे मला वाटते. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. यावेळी प्रास्ताविक औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे यांनी तर मागील वर्षाच्या स्पर्धेचा आढावा औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी घेतला.
यावेळी टाटा मोटर्सचे नितीन कदम (सीनियर मॅनेजर एचआर), प्रवीण तांबे (सीनियर मॅनेजर एचआर), युनियन प्रतिनिधी चेतन बालवडकर, संतोष दळवी, विनोद खुरंगळे, विक्रम वरपे, विलास सपकाळ, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे वाशिम पिरजादे, श्रीनिवास मोरे, जेसीबीचे अमर शिंदे(सीनियर मॅनेजर एचआर), स्पोर्ट्स कमिटीचे दिनेश भुजबळ, सचिन कांबळे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सहखजिनदार विजय हिगें उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सूर्यकांत मुटके,प्रकाश गाडे, किरण लंके, आकाश पिसाळ, रवींद्र वारुळे, शरद खुपटे हे काम पाहत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मागील काही दशकामधील कबड्डी क्षेत्र गाजविलेले व राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले राज्यस्तरीय व राष्ट्रीय जेष्ठ खेळाडू पुणे विद्यापीठाचे माजी कर्णधार यादवराव धस, गोपाल मस्के, अंकुश भोसले हेही उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करण्याचे आवाहनही केले.
सामन्याचे प्राथमिक निकाल खालील प्रमाणे..
१) टाटा मोटर्स ब विरुद्ध एसकेएफ यात झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये टाटा मोटर्स बी संघ ३०-२३ अशा गुणांनी विजयी झाला. या सामन्यामध्ये कोमल चकटे, किशोर मुसळे, प्रतीक लोकरे, ऋषिकेश कांबळे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
२) टाटा मोटर्स अ विरुद्ध बजाज ऑटो आकुर्डी यात झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये बजाज ऑटो आकुर्डी संघ ३१–१९ अशा गुणांनी विजयी झाला. या सामन्यांमध्ये खेळाडूंनी अत्यंत चुरशीचा खेळ करत खेळाडू वृत्तीचे दर्शन घडविले. या सामन्यामध्ये युनूस पिरजादे, साईप्रसाद संनगर, प्रज्वल ढोले, ओंकार पाटील, विक्रम बालवडकर यांनी उत्कृष्ट खेळ केला
३) जेसीबी विरुद्ध बजाज ऑटो चाकण या सामन्यामध्ये जेसीबी २८–२१ अशा गुणांनी विजयी झाली. या सामन्यांमध्ये ऋषिकेश देसाई, निखिल गुहागरकर, अतुल लट्टे, प्रज्वल कोरडे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
४) टाटा मोटर्स ब विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा यात झालेल्या सामन्यांमध्ये टाटा मोटर्स ब संघ २४–१४ अशा गुणांनी विजयी झाला. या सामन्यामध्ये सौरव धुळेकर, किशोर मुसळे, सनी राठोड, अजित जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला.