चिखली (Pclive7.com):- चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकून बांधलेले २९ बंगले पाडण्याची कारवाई सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने आज (दि.१७) पहाटे पासून सुरू केली आहे.

जेसीबी, पोकलनसह १० मशीन कारवाई आज पहाटे सुरू करण्यात आली आहे. प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी आहे. कारवाई रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. येथील नागरिकांनी रात्रीतून घरसामान हलविल्याने नुकसान टळले आहे.






















Join Our Whatsapp Group