वाकड (Pclive7.com):- मस्करीमध्ये चापट का मारली असा जाब विचारल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने तरुणाच्या गळ्यावर कात्रीने वार केले. ही घटना गुरुवारी रात्री वाकड येथील एकता कॉलनीमध्ये घडली.
याप्रकरणी विष्णू विठ्ठल गायकवाड (वय २१ रा. डांगे चौक यांनी वाकड) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी विधी संघर्ष बालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रामचंद्र दत्तात्रय सरकले हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र रामचंद्र हे जेवण करून रूमवर येत होते. यावेळी त्यांच्या ओळखीचा प्रीतम व त्याचा मित्र आरोपी (अल्पवयीन) दोघे समोरून आले.
यावेळी आरोपी (अल्पवयीन) बालक हा मस्करी मध्ये फिर्यादी याच्या गालावर चापट्या मरत होता. यावेळी फिर्यादी यांचा मित्र रामचंद्र याने मस्करी मध्ये संबंधित विधीसंघर्षित बालकास तू चापटा का मारतोस असे विचारणा केली याचा राग आला. आरोपी हा शेजारी असलेल्या मेन्स पार्लरमध्ये गेला व तिथून त्याने कात्री आणली. त्याने रामचंद्र याला तुला मारून टाकीन अशी धमकी देत फिर्यादीच्या मित्राच्या गळ्यावर कात्रीने दोन वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.