पिंपळे सौदागर (Pclive7.com):- ज्यांना काही कारणांमुळे यावर्षी प्रत्यक्ष वारीत सहभागी होता आलं नाही, त्यांच्यासाठी खास आषाढी वारी निमित्त रविवार (दि.०६) रोजी सकाळी ८.५० वाजता पिंपळे सौदागर मध्ये वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि.६ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता कोकणे चौक ते विठ्ठल मंदिर पिंपळे सौगदर या मार्गावर हा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. सकल पिंपळे सौदागर नगर यांच्यावतीने या वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री विठ्ठलाच्या कृपेने आणि आपुलकीने आपण सर्वांना एकत्र येऊन विठ्ठलनामात रंगायचं आहे. जरी आपण पंढरपूर वारीत पावलांनी चालत जाऊ शकलो नाही, तरी आपल्या मनाने, भावनेने आणि भक्तीने आपण विठ्ठलाच्या चरणीच आहोत. चला येथेच आपण एकत्र येऊ, हरिपाठ, अभंग, भजन, कीर्तन करू. आपल्या घरच्या गावात, आपल्या हातात माळ, ओठांवर विठ्ठलनाम, डोळ्यांत भक्तीरस अशीच आपली वारी.

विठ्ठलनामातली एक छोटी वारी आपल्या पिंपळे सौदागर गावात करूया.. विठ्ठलाच्या चरणी आपल्या प्रेमभावाची ओटी वाहूया. आपण सर्वांनी एकत्र येऊन नामस्मरणाचा सोहळा करूया. तरी या वारीसारख्या भक्तिसोहळ्याला अधिक अर्थपूर्ण आणि पवित्र करूया असे आवाहन सकल पिंपळे सौदागर नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.