पिंपरी (Pclive7.com):- “थेंबे थेंबे तळे साचे”—हे आपण ऐकत आलो आहोत, पण पिंपरी चिंचवड शहरात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेलं ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियान ही उक्ती जिवंत करत आहे. दान आणि सेवाभावाच्या माध्यमातून उगम पावलेला हा उपक्रम आज एक सामाजिक क्रांती ठरतो आहे.

🔹 संकल्पना अत्यंत सोपी आणि सुलभ
दर महिन्याला एका कुटुंबाने, एका मुलाच्या एक वेळच्या जेवणासाठी २००–२५० ग्रॅम इतकं म्हणजे हाताच्या मुठीइतकं धान्य दान करावं. हे लहानसं योगदान आता हजारो मुठींनी पोसलेली एक व्यापक चळवळ बनली आहे.
📊 अभियानाची ठळक वैशिष्ट्ये:
▪️ ७ उपनगरांमध्ये कार्यरत
▪️ ८०+ सोसायट्यांचा सहभाग
▪️ दर तिसऱ्या रविवारी संकलन: ५,०००–६,००० किलो धान्य
▪️ मिळालेलं धान्य त्या दिवशीच अनाथ व वृद्धाश्रमांना सुपूर्त
▪️ ६५० कार्यकर्त्यांचे कार्यक्षेत्र
▪️ दर महिन्याला ३२,००० कुटुंबांपर्यंत पोहोच
▪️ ४ वर्षांत: २,०४,००० किलो धान्य संकलन
▪️ सेवा पोहोचलेली: ४९ अनाथ व वृद्धाश्रम
▪️ दररोज: ७००+ गरजू मुलं व वृद्धांना भरपेट जेवण
▪️ एकूण जेवणांची सोय: १०,२०,०००+

🎯 प्रेरणा देणारं नेतृत्व
अध्यक्ष — विनोद पाटील (भारत भूषण व Inspiring Human पुरस्कारप्राप्त)
संस्थापक — गिरीजा ताई शिर्शीकर
मार्गदर्शक — गिरीश देगावकर, विनायक काका कुलकर्णी
🗣️ कार्यकर्त्यांचे विचार – हृदयातून आलेले शब्द
“आज या अभियानाने एक सामाजिक क्रांती चे रूप घेतले आहे. कुणीही उपाशी पोटी झोपू नये या साठी सगळे कार्यकर्ते या अभियानात योगदान देत आहेत. अभियानाच्या माध्यमातून जरी रोज ७०० मुलांच्या जेवणाची व्यवस्था होत असली तरीसुद्धा हि एक छोटीशी सुरवात आहे. आम्हाला महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील गरजू संस्था पर्यंत पोहचायचे आहे. हा मार्ग खडतर असला तरी आमचे कार्यकर्ते हे सहज शक्य करतील असा विश्वास आहे. सर्व कार्यकर्त्यांनी निश्चयाचा महामेरू हाती घेतला आहे.”– विनोद पाटील, अध्यक्ष
“एक मूठ धान्य ही संकल्पना जरी छोटी वाटत असली तरी तिचा प्रभाव प्रचंड मोठा आहे. ७०० कार्यकर्ते आप आपले योगदान देतात आणि त्यातून प्रत्येक महिन्यात ६–७ हजार किलो धान्य जमा होते.”
– अभय बाविस्कर, सचिव, पिंपळे सौदागर
“आपण समाजासाठी काही करतोय याचे समाधान वाटते. अभियानाच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे समाजाचा प्रचंड विश्वास या अभियानावर आहे.”– केशव जोशी, पिंपळे सौदागर
“१ वर्ष पूर्वी वाकड परिसरात फक्त ४ सोसायटी अभियानाशी जुळल्या होत्या, आज २१ सोसायटी आहेत आणि दर महिन्याला अनेक सोसायटीकडून निरोप येत आहेत. यातून दिसून येते की समाजात या अभियानाबद्दल किती आत्मीयता आहे.”
– अभिजीत चौधरी, वाकड
“दर महिन्याला ३२ हजार कुटुंब आमच्या विनंतीला मान देऊन समाजच्या वंचित घटकांना मदत करण्यासाठी पुढे येतात.”– अनिकेत देशमुख, सचिव, वाकड
“आमच्यासाठी प्रत्येक महिन्यात हा एक उत्सव असतो आणि प्रत्येक कार्यकर्ता या उत्सवात अतिशय उत्साहाने भाग घेतो. दर महिन्याला आपण काहीतरी समाजासाठी करतोय याच समाधान लाभते.”
– प्रसाद पाडगावकर, कार्यकर्ता
“या सामाजिक चळवळीचा भाग म्हणून मला अभिमान वाटतो. ‘एक मुठ्ठी अनाज’ अभियानाच्या माध्यमातून १००+ सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा निश्चय आहे—आणि आम्ही ते साध्य करणारच.”– विवेक कासट, कार्यकारिणी सदस्य
📝 सेवा वर्धिनी – ‘एक मुठ्ठी अनाज’ कार्यकारिणी
अध्यक्ष: विनोद पाटील
संस्थापक: गिरीजा ताई शिर्शीकर
मार्गदर्शक: गिरीश देगावकर, विनायक काका कुलकर्णी
सचिव (पिंपळे सौदागर): अभय बाविस्कर
वाकड सचिव: अनिकेत देशमुख
पिंपळे सौदागर सचिव प्रतिनिधी: केशव जोशी
वाकड सचिव प्रतिनिधी: अभिजीत चौधरी
कार्यकर्ता: असा नको.
कार्यकारिणी सदस्य :
प्रसाद पाडगावकर . सचिन देशपांडे · विवेक कासट · माणिक सुद्रिक · नकुल देशपांडे · चक्रधर बोरकुटे · शिवराम लटपटे · संदीप गुंजाळ · शिवकुमार प्याती · संदीप काळे · नितीन साळवे · तुषार शाह · पुरुषोत्तम शेटे · विरल शाह · पुष्कर सरणीस · भागवत पाटील · चंदन चौरासिया · आनंद गुजराथी · शिखर श्रीवास्तव · विष्णूकांत पांडे · तरुण सिथा · गणेश पाटील · नितीन भिरूड · सुभाष पाठक · नितीन चौधरी · अरविंद पुराणिक · अरविंद जाधव · बाळकृष्ण मसलगेकर · संजय पाटील · रुपेश हेलवाडे
💬‘एक मुठ्ठी अनाज’ ही संकल्पना नव्हे, ती संवेदनशीलतेची चळवळ आहे. एका मुठीतून जे शक्य आहे ते केवळ अन्नदान नाही—ते एका समाजाची गरज ओळखून पुढाकार घेणं आहे. दर महिन्याला हजारो हात एकत्र येतात… आणि हजारो जिवांना दिलासा मिळतो. ही मुठ आता एक चळवळ झाली आहे.





















Join Our Whatsapp Group