पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो भुयारी मार्ग व उड्डाणपुलाच्या भिंतीला लावण्यात आले आहेत. हे फोटो कोणी लावले? याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

मारुती भापकर यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करताना देवाभाऊ असा उल्लेख करून वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये जाहिरातबाजी करण्यात आली. या जाहिरातीचे लोण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पसरले आहे. काही लोकांनी अशा प्रकारची जाहिरातबाजी शहरातील भुयारी मार्ग (अंडर ग्राउंड) रस्ते तसेच उड्डाण पुलावरील भिंतींवर असे देवभाऊ शिवरायांना अभिवादन करीत असणारे पोस्टर चिटकवले आहेत.

हे पोस्टर चिटकवणाऱ्यांनी अभिवादन करण्यासाठी लावले की विटंबना करायला लावले असा प्रश्न निर्माण झालेला आहे? हे पोस्टर अश्या ठिकाणी लावले आहे की रस्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे या पोस्टरवरील शिवरायांच्या व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखल उडतो आहे. आणखीण बऱ्याच गोष्टी या पोस्टर बाबत घडू शकतात. त्यामुळे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व घटनात्मक पदावर असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची विटंबना होत आहे.

काहींनी राजकीय स्वार्थ ठेवून ज्या ज्या ठिकाणी अशी बॅनर लावले असतील त्या त्या ठिकाणचे हे बॅनर तातडीने काढून टाकावेत. तसेच या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून हे बॅनर लावणारे कोण? त्यांचा हे बॅनर अशा योग्य ठिकाणी लावण्याचा उद्देश नेमका काय आहे? याचा छडा लावून संबंधित या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group