
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लायम्बिग वॉल असणाऱ्या योगा पार्कमध्ये सर्वात पहिल्या २९ वी आयएमएफ फाउंडेशन पश्चिम विभाग अंतर्गत राष्ट्रीय अजिंक्यपद क्लायम्बिंग स्पर्धा २०२५ चे उद्घाटन माझी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते संपन्न झाली.

पिंपळे सौदागरमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या योगा पार्क मधील आशिया खंडातील सर्वात मोठ्या सर्व आत्याधुनिक सोयीसुविधायुक्त क्लायम्बिंग वॉल साकारण्यात आलेले आहे.

याठिकाणी आज सर्वात पहिल्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून २९ वी आयएमएफ फाउंडेशन पश्चिम विभाग अंतर्गत राष्ट्रीय अजिंक्यपद क्लायम्बिंग स्पर्धा २०२५ चे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागातील १५० खेळाडू सहभागी झाले आहेत. या योगा पार्कमध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिंग वॉल, २१ मीटर उंचीची स्पीड वॉल, २१ मीटर उंचीची लीड वॉल आहे. या योगा पार्क मध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळासाठी खेळणी तसेच जेष्ठांसाठी व्यायामासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

या क्लायम्बिंग वॉल मध्ये सराव करणारे खेळाडू हे नॅशनल स्तरावर खेळतील अशा उत्तम दर्जाची ही वॉल आहे. या क्लायम्बिंग वॉल व स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेविका निर्मला कुटे, आयएमएफ फाउंडेशनचे चेअरमन के सरस्वती, सेक्रेटरी श्रीकृष्ण कडुस्कर, सदस्य सुरेंद्र शेळके, निवृत्त डीजीपी ॲड. नरेद्र निकम, निवृत्त लष्कर अधिकारी देवांग नायक व इतर मान्यवर खेळाडू उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group