पिंपळे गुरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एकमेव अशा राणी ठरल्या ज्यांनी वैधव्याचा आघात सहन करतही समाजसेवा, शिक्षण आणि न्यायव्यवस्था या क्षेत्रात अद्वितीय कार्य केले.अहिल्यादेवींचा संघर्ष म्हणजे धैर्य, त्याग आणि जनसेवेचे प्रतीक असून त्यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार हभप पंकज महाराज गावडे यांनी पिंपळे गुरव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी- पिंपळे गुरव यांच्या वतीने आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हभप गावडे महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पिंपळे गुरव येथील मनपाच्या नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमास चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, गोसेवक विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे, वारकरी महामंडळ शहराध्यक्ष विजयअण्णा जगताप, संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, मनपा कार्यकारी अभियंता विजय भोजने, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, व्याख्याते डॉ. सुनिल धनगर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, महेश जगताप, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, वैशाली जवळकर, माजी वन अधिकारी मधुकर लंभाते, पोलीस निरीक्षक अलका सरक, सामाजिक कार्यकर्ते माऊली जगताप, राहुल जवळकर, संजय जगताप, वृक्षमित्र अरुण पवार, संजय कणसे, तानाजी जवळकर, श्याम जगताप, शोभा जांभुळकर, संघाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू गाडेकर, अजय दूधभाते, अध्यक्ष नवनाथ बिडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी सेवा संघाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना व्याख्याते डॉ. सुनील धनगर म्हणाले की, शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून आवडत्या क्षेत्रात करिअर करायला हवे.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी धैर्य, कर्तृत्व आणि सुशासनाचे अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जगताप म्हणाले की,विद्यार्थ्यांनी फक्त उत्तम गुण मिळविणे पुरेसे नाही, तर चांगले व्यक्तिमत्व घडविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणासोबत चारित्र्य, शिस्त आणि समाजभावना जोपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे परिश्रमही महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा सन्मानही तितकाच महत्वाचा आहे.
माजी अध्यक्ष सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष सचिन सरक यांनी सूत्रसंचालन केले.

























Join Our Whatsapp Group