
इंद्रायणीनगरमध्ये सेवा सप्ताहा अंतर्गत ३८४ शिक्षकांचा गौरव समारंभ संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानदान करतात. यशस्वी विद्यार्थी घडविण्याची त्यांची धडपड असते. शिक्षक आपल्या कार्यातून विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचे काम करत असतात, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी व्यक्त केले.

भोसरी, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ इंद्रायणीनगर भारतीय जनता पक्ष व श्री साई चौक मित्र मंडळ विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या वतीने भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहा अंतर्गत तसेच जागतिक शिक्षक दिनाचाही आऊचित्त साधून प्रभाग क्र.८ मधील शिक्षक गौरव समारंभ पार पडला.

या सोहळ्यात मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक अशा एकूण ३८४ जणांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वय़ंसेवक संघाचे देहू गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मदत केली त्यामध्ये प्रभाकर थोरात, नंदकुमार ठाकूर पंडित मोरे, दीपक बागुल, नारायण काकडे, शैला मातेरे, उत्तम बारगळ नवीन आहेर तसेच सत्कारासाठी ८० वर्ष पुढील ज्येष्ठ शिक्षक असलेले उत्तमराव करांडे शिवाजीराव टेकाळे साधना बॅनर्जी असे टागोर, भैरवनाथ, स्वामी समर्थ, प्रियदर्शिनी, अभिषेक, तलेरा, वैश्र्नोमाता साधुवस्वनी जिंगल bell sapling असे अनेक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले आभार धनंजय जाधव यांनी मानले.

























Join Our Whatsapp Group