
पिंपरी (Pclive7.com):- ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती’तर्फे चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता चाकण येथून पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी येथे पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामुळे शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक शाखेने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.

पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(अ)(ब), ११६(४) व ११७ अन्वये तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

वाहतूक बंद असणारे मार्ग :
काचघर चौक – भेळ चौक – संभाजी चौक (प्रकाश बाबुराव पाटील चौक) – बिजलीनगर ब्रिज चढतो या सर्व्हिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या ये-जा करण्यास बंदी राहील.
तसेच प्रकाश बाबुराव पाटील चौक (बिजलीनगर ब्रिज चढतो) येथून पीएमआरडीए कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग :
पीएमआरडीए कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एलआयसी कॉर्नर मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वरील मार्गावरील वाहने मुख्य रस्त्याचा वापर करून इच्छित स्थळी जाऊ शकतील.
वाहतूक बंदीची वेळ :
दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी १४.०० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी राहील.
पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नमूद कालावधीत वरील बंद मार्गांऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

























Join Our Whatsapp Group