
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदासाठी विपिन इटनकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. ते सध्या नागपूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

आयुक्त सिंह यांची तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्याने मंगळवारी (दि.७) शासनाकडून त्यांची बदली करण्यात आली. त्यांना कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. तर, तुर्तात महापालिका आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, महापालिकेला नवीन आयुक्त कोण भेटणार हा, प्रश्न अनुत्तरीत होता. मात्र, पिंपरी-चिंचवडला नवे आयुक्त म्हणून विपिन इटनकर यांचे नाव समोर आले आहे.

त्यांची आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे. आता इटनकर हे ऑगस्ट २०२२ पासून नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत. ते २०१४ च्या महाराष्ट्र बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मिशन युवा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेले आहे. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून शिस्तप्रिय व संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

























Join Our Whatsapp Group