
प्रदीर्घ काळापासून आजारी होते असरानी
ज्येष्ठ अभिनेते असरानी हे गेल्या काही काळापासून आजारी होते. असरानी हे दीर्घ काळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. असरानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की दीर्घकाळापासून असरानी आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांचं निधन झालं असं बाबुभाई यांनी सांगितलं. असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ ला झाला होता. जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. हरे कांच की चुडिया या चित्रपटांतून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.
शोलेमधला जेलर ठरला अजरामर
शोले सिनेमातली जेलरची भूमिका अजरामर ठरली. कारण या भूमिकेवर हिटलरची छाप होती. विनोदी ढंगाची ही भूमिका लोकांच्या पसंतीस पडली. त्याचं चालणं, त्याची खास स्टाईल यामुळे त्या भूमिकेची चर्चा झाली. चित्रपटातले जय, विरु, ठाकूर, बसंती हे जसे गाजले तशीच असरानी यांनी साकारलेली जेलरची भूमिकाही स्मरणात राहिली.


























Join Our Whatsapp Group