

विविध शासकीय योजनांची माहितीही उपलब्ध होणार; भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- जनता पक्ष युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर व शासकीय योजना आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली कुदळवाडी परिसरातील नागरिकांना या शिबिराचा मोठा लाभ घेता येणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांना विविध आजारांची मोफत तपासणी व औषधोपचार या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मुळव्याध शस्त्रक्रिया, नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी, फिजिओथेरपी, चामखीळ, मोस, मस्सा काढणे, तात्काळ वेदना शमन चिकित्सा यांसह अनेक उपचार मोफत स्वरूपात केले जाणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत तपासणी व सल्ला मार्गदर्शन, मोफत लसीकरण (बालकांसाठी) आदी सुविधा देखील उपलब्ध असतील.

शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन..
याशिवाय शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची नोंदणी व मार्गदर्शन मिळणार आहे. यात वयोवंदना कार्ड, माझी लाडकी बहीण योजना KYC, सुकन्या समृद्धी योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, घरगुती कामगार कल्याण योजना, क्रांतीज्योती बाल संगोपन योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे.

येथे घ्या शिबिराचा लाभ..
श्री. तात्यासाहेब सपकाळ क्रिडांगण, आण्णासाहेब बँक समोर, कुदळवाडी, चिखली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत आणावा, असे आयोजकांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी ९७६३९००७७५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“या शिबिराचा उद्देश म्हणजे समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हा आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक उपचार घराजवळ मिळतील. तसेच शासकीय योजनांची देखील माहिती मिळेल. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,”– दिनेश लालचंद यादवअध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर.

























Join Our Whatsapp Group