

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला शिरगाव पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.२) दुपारी पाचाणे गावाचे हद्दीत, पायबा मंदिराच्या बाजूला, प्रमिला जनरल स्टोअरजवळ करण्यात आली. राकेश मधुकर रेणसे (३५, रा. पाचाणे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश रेणसे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक वर्षाच्या कालावधीसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले होते.

तडीपारीचे आदेश असतानाही, त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत वावरत असताना त्याला पकडण्यात आले. तसेच, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता आढळून आला. शिरगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.


























Join Our Whatsapp Group