

पिंपरी (Pclive7.com):- जादा तासाच्या नावाखाली शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे उघडकीस आहे. ही घटना शनिवारी (दि.१) दुपारी निगडी परिसरात घडली.

चेतन सुरेशराव चव्हाण (४०, रा. इम्पिरीयल हाइट्स, भारतमाता हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय विद्यार्थिनीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील चाणक्य फाउंडेशन या क्लासमध्ये चव्हाण हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याने फिर्यादी विद्यार्थिनीसह आणखी एका मुलीला जादा क्लाससाठी बोलावले. दुसऱ्या विद्यार्थिनीला रसायनशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी चौथ्या मजल्यावर पाठवून आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीला लिफ्टमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला.

यानंतर ती विद्यार्थिनी दुसऱ्या मुलीसोबत बसली असताना, ऑफिस बंद करायचे आहे, असे सांगून आरोपीने तिला पुन्हा खाली येण्यासाठी भाग पाडले. लिफ्टमधून खाली जाताना त्याने पुन्हा तिच्यावर अश्लील प्रकार केला. त्यानंतर “तुला सोडवण्यासाठी मी घरी येतो” असे म्हणत आरोपीने धमकीवजा शब्द वापरले. मात्र, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून “मला मावशीकडे जायचे आहे” असे सांगून सुटका करून घेतली. घरी परतल्यावर तिने संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. निगडी पोलिस तपास करत आहेत.

























Join Our Whatsapp Group