



असा असेल निवडणूक कार्यक्रम..
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५
नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक आकडेवारी…
राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे.
मतदारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल ॲप
दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल ॲपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.



























Join Our Whatsapp Group