
पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम नगर प्रभागातील माजी नगरसेवक जितेंद्र नानावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पिंपरी विधानसभेतील, संत तुकाराम नगर प्रभागातील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात जितेंद्र ननावरे सध्या कार्यरत होते. त्यांनी आज पुणे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यलायात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्ष नेते श्याम लांडे, नाना काटे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

जितेंद्र ननावरे २००७ ते २०१२ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत क्रीडा समिती सभापती पद त्यांनी भूषवले होते. मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी करिता त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जितेंद्र ननावरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पिंपरी मतदारसंघात पक्षाची ताकद वाढली आहे.

























Join Our Whatsapp Group