चिंचवड (Pclive7.com):- स्नेहा रणजीत कलाटे यांच्या कार्य अहवालाचे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. स्नेहा कलाटे या गेल्या अनेक वर्षांपासून रणजीत आबा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून वाकड, कस्पटे वस्ती, विशाल नगर, जगताप डेअरी व पिंपळे निलख परिसरात सेवा आणि समर्पण भावनेतून सामाजिक कार्य करीत आहेत.

स्नेहा कलाटे यांचा परिचय कार्याचा, सेवा आणि समर्पणाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. प्रकाशन झाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी कार्य अहवाल बारकाईने पाहत अनेक कार्यक्रमादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण देखील झाली. अहवालाची मांडणी, रचना, रंगसंगती, प्रिंटिंग याचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले.

मागील १२ वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन स्नेहा कलाटे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच फाउंडेशनचे सर्व सहकारी जनसेवेचे व्रत पुढे घेऊन जात आहेत. त्याचा संक्षिप्त स्वरूपातील हा कार्यअहवाल पाहताना, नक्कीच जनसामान्यांच्या सोबत फाउंडेशनच्या माध्यमातून असणारे ऋणानुबंध किती घट्ट आहेत याची जाणीव होते, आणि हि जाणीव नक्कीच जबाबदारी वाढवणारी देखील आहे असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

हा कार्यअहवाल लवकरच वाकड, कस्पटे वस्ती, विशाल नगर, जगताप डेअरी व पिंपळे निलख परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचेल. आजवर मिळालेले जनतेचे आशीर्वाद शुभेच्छा आणि मार्गदर्शन पुढील काळात माझ्यासोबत अखंड राहतील.
– स्नेहा रणजीत कलाटे

























Join Our Whatsapp Group