
पिंपरी (Pclive7.com):- स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची तब्बल ५० लाख २ हजार ५२९ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १९ मे ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन घडली.

याप्रकरणी सतीष रविंद्र हैदरशेट्टी (३९, रा. डुडुळगाव फाटा, डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आयेश सुलताना, आणि अतुल भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आयेश याने फिर्यादीला एका व्हाट्स अप ग्रुप मध्ये जॉईन केले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून एका लिंकद्वारे एका ॲप्लिकेशनवर गुंतवणुकीच्या नावाखाली, वेगवेगळ्या बँक खात्यांवर विविध शेअर्स आणि आयपीओच्या नावाखाली रक्कम भरण्यास भाग पाडले.

ही रक्कम काढण्यासाठी पुन्हा वेगवेगळे टॅक्सच्या नावाखाली रक्कम भरण्यास सांगितले. फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर ५० लाख २ हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली आहे.

























Join Our Whatsapp Group