पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून पळवून नेलेल्या एका महिलेचा धाराशिवमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. याच मृतदेहाचं कोडं आता उलगडलं असून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अनिकेत महादेव कांबळे असं या आरोपीचं नाव आहे. तर राणी विशाल गायकवाड असं २६ वर्षीय खून झालेल्या महिलेचे नावं आहे. राणी आणि अनिकेत यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच राणी अनिकेत बरोबर राहण्यासाठी तगादा लावत होती. त्यामुळे संतापलेल्या अनिकेतने २६ नोव्हेंबरला राणीला गाडीत बसवून गावी जायच्या बहाण्यानं थेट धाराशिवला नेलं.

२७ नोव्हेंबर च्या पहाटे गाडीतच राणीचा गळा दाबून आणि रॉडने डोक्यात मारहाण करून खून केला. व मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून त्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह सापडल्यानंतर ढोकी गावाजवळील स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. तर पुण्यातही राणीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात नोंद केली होती.

वाकड पोलिसांनी राणीचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर अनिकेतवर संशय आला, त्याची चौकशी पोलिसांनी केली. याच चौकशीतून अनिकेतने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आहे.

























Join Our Whatsapp Group