पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील ‘हॉटेल रंगला पंजाब’ रेस्टॉरंटच्या खालच्या मजल्यावर आज अचानक आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी घाबरून खबरदारी घेतली.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. कार्यकर्त्यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून आग विझवण्याची मदत मागवली. नगरसेवक काटे यांनी स्वतःही परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला आणि आवश्यक ती तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचताच आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून गंभीर नुकसान होण्यापासून बचाव झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू आहे.

घटनास्थळावर लोकप्रतिनिधी म्हणून शत्रुघ्न काटे यांनी घेतलेली तातडीची खबरदारी आणि प्रशासनाचा जलद प्रतिसाद यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

























Join Our Whatsapp Group