पुणे (Pclive7.com):- राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींसाठी आज (दि.०२) मंगळवारी मतदान होत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार असून, ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील. दरम्यान उद्या (दि.०३ डिसेंबर) रोजी या सर्व निवडणुकींचा निकाल लागणार आहे.

राज्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला घोषित केल्या होत्या. त्यानुसार, २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काही उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेले अपील प्रलंबित असल्याने एकूण २० नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर ७६ नगर परिषदा, नगर पंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक स्थगित झाली आहे. उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी प्रचारतोफा सोमवारी रात्री थंडावल्या. या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांचा विषय गाजला होता.

निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार लावून मतदारयाद्या प्रसिध्द केल्या आहेत. हे मतदार मतदान करण्यास आल्यानंतर त्यांच्याकडून इतर कोणत्याही ठिकाणी मतदान करणार नाही, असे शपथपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे या निवडणुकीत पाहावे लागेल. उर्वरित ठिकाणी मंगळवारी निवडणूक होत आहे.
मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना लागू राहील. तेथील केंद्र शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका इत्यादींना ही सुट्टी लागू राहील.

निवडणूक सज्जता अशी…
-नगर परिषदा व नगर पंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान.
-राज्यातील १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
-मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीही व्यवस्था.
-पुरेशा मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था. एकूण १७ हजार ३६७कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश
-राज्यातील १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
-मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीही व्यवस्था.
-पुरेशा मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था. एकूण १७ हजार ३६७कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश

























Join Our Whatsapp Group