पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गाव येथील बालगोपाल शाळेजवळील वाघेरे पार्क सोसायटी समोर चालणाऱ्या अवैध ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश पिंपरी पोलिसांनी केला आहे. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वन डे क्रिकेट मॅच वर (दि.०६) रोजी अवैधरित्या बेटिंग घेत असताना पोलिसांनी छापा टाकून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भावेश प्रदीप लखवानी (वय २५, रा. विजय अपार्टमेंट धनराज सोसायटी समोर पिंपरी), पांडे (वय ४०, रा.पिंपरी), किरण (वय ४०, रा.पिंपरी) या तिघांच्या विरोधात कलम १२(अ) तसेच इंडियन टेलिग्राफ अॅक्ट कलम २५(क) प्रमाणे या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी गाव येथील बाळगोपाळ शाळेजवळील वाघेरे पार्क सोसायटी समोर (दि.६) रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी पोलिसांना आरोपी भावेश लखवानी हा मोबाईल फोनद्वारे भारत व अफ्रिका क्रिकेट सामन्यांवर बेटिंग स्वीकारताना आढळला. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीचा मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे हे करीत आहेत.

























Join Our Whatsapp Group