
पिंपरी (Pclive7.com):- बसस्टँड व गर्दीच्या ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. अवघ्या एक तासांत तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, स्पोर्ट बाईक असा सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढलेल्या सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार निगडी बसस्टँड, मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरात तीन महिला वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने काढून पळ काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
या कारवाई दरम्यान तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वृद्ध महिलांना लक्ष्य करून सोन्याच्या मणी-मंगळसूत्र व दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासामध्ये सदरच्या महीलांची अंतरराज्य चोरी करणारी टोळी असुन त्यांच्यावर अफजलपुर, गुलबर्गा, विजयपुरा, राज्य कर्नाटक तसेच बाद्रा, परभणी, दादर, कुर्ला, महाराष्ट्र येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच तपासात चोरीस मदत करणाऱ्या आणखी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून तिच्याकडून घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोटारसायकल चोरी प्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उप निरिक्षक सुर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस शिपाई सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, केशव चेपटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group