पिंपरी (Pclive7.com):- एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि.२०) रात्री निगडी येथे करण्यात आली.

पोलिस अंमलदार गणेश कारोटे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लॉज मॅनेजर असलम इलाही शेख (वय २४, रा. निगडी, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) याला अटक केली असून, लॉज मालक अशोक भिकाजी काळे (रा. निगडी) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या व्यवसायातून मिळालेल्या रकमेवर संशयित आपली उपजीविका भागवत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली.





















Join Our Whatsapp Group