पिंपरी (Pclive7.com):- गुजरात येथे होणाऱ्या १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी अभिनव देसाई याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते अभिनव देसाई याचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दिलीप सिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, सचिव राजू कोतवाल तसेच अभिनवचे वडील विनोद देसाई उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी उपाध्यक्ष योगेश बहल यांनी अभिनवच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास व्यक्त केला. अभिनव देसाई हा पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमीत नियमित सराव करत असून, क्रिकेट प्रशिक्षक राजू कोतवाल व सुनील कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपले कौशल्य अधिक विकसित करत आहे. अभिनवच्या या यशाबद्दल क्रीडा प्रेमींनी तसेच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.





















Join Our Whatsapp Group