BREAKING NEWS
GMT+2 09:23

अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल,डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे (Pclive7.com):- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून पुणे जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मनाई केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या खासगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तु व सेवा संदर्भात कार्य करणारी खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यातून सूट देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी असणार आहे.

(सविस्तत वृत्त लवकरच)

error: Content is protected !!
WhatsApp Join Our Whatsapp Group