पिंपरी (Pclive7.com):- साने चौक, चिखलीमधील कृष्णा कॉम्प्लेक्स येथील ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगारावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी ३ लाख १५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बालाजी व्हिडिओ गेम पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटरचे चालक मालक पियुष धर्मेंद्र राय (वय २२, रा. केशवनगर, चिखली. मूळ रा. बिहार), सुखकर्ता व्हिडीओ पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटरमधील चालक कामगार अक्षय ज्ञानदेव माने (वय २१, रा. अजिंठानगर, निगडी), राजश्री व्हिडीओ गेम पार्लर अँड ऑनलाईन लॉटरी सेंटर चालक कामगार शशांक अनिल केशरवाणी (वय २९, रा. यमुनानगर, निगडी) आणि अन्य ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साने चौक, चिखली मधील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या सुखकर्ता, राजश्री आणि बालाजी ऑनलाईन व्हिडीओ गेम अँड लॉटरी सेंटरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला.
त्यात पोलिसांनी ५३ हजार ५२० रुपये रोख रक्कम, १ लाख ५६ हजारांचे व्हिडीओ गेम खेळण्याचे बॉक्स, १०० रुपयांचे जुगार साहित्य, ३३ हजार ४०० रुपयांचे एलईडी व इतर साहित्य आणि ७२ हजार ८०० रुपयांचे १० मोबाईल फोन असा एकूण ३ लाख १५ हजार ८२० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उप निरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार संतोष असवले, संदिप गवारी, पोलीस नाईक भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, पोलीस शिपाई योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वेष्णवी गावडे, संगिता जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली माने व योगिनी कचरे यांनी केली.